Maharashtra State Shikshak MegaBharti 2026: महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026– संपूर्ण माहिती, पात्रता, रिक्त जागा व निवड प्रक्रिया

Maharashtra Shikshak MegaBharti 2026: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकारी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी बातमी आलेली आहे Maharashtra Shikshak Bharti 2026 साठी खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व तसेच अनुदानित शाळांमधील रिक्त पदांसाठी शिक्षक पदे पवित्र Portal द्वारे भरली जाणार आहेत. सध्या 30,209 शिक्षक पदांसाठी पसंतीक्रम ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरतीमध्ये किती जागा रिक्त आहेत?

मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की यंदाच्या शिक्षक भरतीमध्ये 30,209 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून राज्यामध्ये बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरून शिक्षण व्यवस्थेला पाठिंबा देण्याचा या भरतीचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो पात्र उमेदवारांनी वेळच्या वेळेत पसंतीक्रम भरून दिल्यास पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल.

ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

मित्रांनो भरतीमध्ये खालील प्रकारच्या शिक्षक पदांचा समावेश असणार आहे.

प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, विषय शिक्षक, अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक (लागू असल्यास)

लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता

मित्रांनो पदानुसार ही पात्रता बदलू शकते. सामान्यतः खालील अर्हता आवश्यक असू शकते.

D.Ed. / D.El.Ed.B.Ed.संबंधित विषयातील विविध पदव्या TAIT पात्रता,TET पात्रता जर लागू असल्यास, अंतिम पात्रता संबंधित अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाईल.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे.

किमान वय – 18 वर्षे

कमाल वय – शासन नियमांनुसार असणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट असणार आहे

शिक्षक भरती साठी निवडप्रक्रिया कशी केली जाणार

मित्रांनो शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील प्रकारे केली जाणार आहे.

  • ऑनलाइन नोंदणी
  • TAIT गुणांचा विचारशाळांचा पसंतीक्रम
  • (Preference)गुणवत्ता यादी (Merit List)
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम नियुक्ती करुन

शिक्षक भरतीला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वी व 12वी गुणपत्रिकापदवी प्रमाणपत्र.
  • DEd./B.Ed. प्रमाणपत्र
  • TAIT गुणपत्रक
  • TET प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी

शिक्षक भरतीची तयारी कशाप्रकारे करावी ?

मित्रांनो सरकारी शिक्षक बनण्यासाठी फक्त पात्रता पुरेशी नसते, त्यासाठी योग्य परिश्रम आणि योग्य तयारीही आवश्यक असते.TAIT अभ्यासक्रमाचे सराव करावे .मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सराव करावा.शैक्षणिक मानसशास्त्रावर विशेष भर द्यायला हवा.मराठी, इंग्रजी आणि गणिताचा नियमित अभ्यास करायला हवा.चालू घडामोडींचे वाचन करायला पाहिजे.दर आठवड्यातून किमान दोन तरी वेळेस Mock Test सोडवावे .

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात Pdfयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुपयेथे क्लिक करा
  • महत्त्वाच्या सूचना
  • अधिकृत पोर्टलवरील सूचनांनुसारच अर्ज करावे.
  • आपली सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावे.
  • आपली अर्जातील माहिती अचूक भरावी.

Leave a Comment