Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 1,100 पदांची भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी

Bank of Baroda Bharti 2026: मित्रांनो बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे. Bank of Baroda ने वेगवेगळ्या विभागांमध्ये नियमित आधारावर अधिकारी पदांमध्ये भरती जाहीर केलेली आहे.

मित्रांनो या भरतीअंतर्गत एकूण 1,100 पदे भरण्यात येणार .मित्रांनो या भरतीमध्ये Wealth Executive या पदासाठी 1,000 जागा तर Credit Analyst – C&IC या पदासाठी 100 जागा निघालेल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन 4 सप्टेंबर 2026 पासून सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 सप्टेंबर 2026 आहे.

Bank Of Baroda मध्ये कोणती पदे भरण्यात येणार?

1. Wealth Executive – मित्रांनो या भरतीमध्ये सर्वाधिक प्रमाणात 1,000 पदे Wealth Executive (JMG/S-I) पदासाठी निघालेले आहेत. हे पद Bank of Baroda च्या Wealth Management Services Department अंतर्गत आहे.या पदासाठी त्या उमेदवाराकडे त्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या पण शाखेतील पदवी असणे अति आवश्यक आहे. यासोबतच अधिसूचनेत दाखवलेल्या किंवा नमूद केलेल्या पात्र प्रमाणपत्रांपैकी आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

यामध्ये IC-38, NISM Series V-A, NISM Series XXI-A किंवा NISM Series V-D यांचा समावेश आहे.Wealth Executive या पदासाठी संबंधित Wealth Products Sales अनुभवाची अटही तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरातीमधल्या अनुभवाची अचूक अट उमेदवारांनी वाचून घ्यावे.

2. Credit Analyst – C&IC – 100 पदेमित्रांनो दुसरे पद म्हणजे Credit Analyst – Corporate & Institutional Credit (C&IC), MMG/S-II आहे. या पदासाठी 100 जागा निघालेली आहेत.या पदासाठी कोणत्या पण शाखे मधल्या पदवीसोबत Chartered Accountant (CA) ही व्यावसायिक पात्रता आवश्यक असल्याचे हे उपलब्ध भरती तपशिलामध्ये नमूद आहे.म्हणूनच हे पद सर्व पदवीधरांसाठी खुले नाही. CA पात्रता आणि अधिसूचनेमधील अनुभवाच्या अटी पूर्ण करणारेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.

Bank of Baroda मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

या भरतीमध्ये पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी दिलेली आहे.

  • Wealth Executive: 22 ते 32 वर्षे आहे.
  • Credit Analyst – C&IC: 21 ते 33 वर्षे आहे.

अर्ज करताना वयाची गणना ही 1 सप्टेंबर 2026 या तारखेच्या आधारे केली जाते. आरक्षित असलेल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट असू शकते.उमेदवारांनी अर्ज करताना आपली वयोमर्यादा तपासून फक्त जन्मवर्ष न पाहता अधिकृत जाहिरातीत दिलेली cut-off date आणि relaxation नियम हे पण तपासावेत.

Bank of Baroda Bharti 2026 पगार किती आहे?

मित्रांनो या भरती मधील पदे ही अधिकारी स्तरावरील आहेत.

  • Wealth Executive (JMG/S-I): ₹48,480 ते ₹85,920 मूलभूत वेतनश्रेणी.
  • Credit Analyst – C&IC (MMG/S-II): ₹64,820 ते ₹93,960 मूलभूत वेतनश्रेणी.

याशिवाय मित्रांनो बँकेच्या नियमांनुसार लागू असल्यास इतर भत्ते आणि सेवांचा लाभ पण मिळू शकतो.

या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे ?

Bank of Baroda Recruitment 2026 साठी अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे दिलेली आहेत.-

  • General / EWS / OBC: ₹850-
  • Sc/ST / PwBD / ESM / महिला: ₹175

मित्रांनो पेमेंट करताना लागू असलेले Payment Gateway वेगवेगळे आणि त्यावर Charges पण वेगळे वेगळे लागू होऊ शकतात.

Bank of Baroda मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?

मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर थेट निवड होणार नाही. उमेदवारांना बँकेने ठरवून दिलेल्या निवड प्रक्रियेमधून निवडून जिथे जे पद मिळेल तिथेच राहावे लागू शकते.उपलब्ध असलेल्या भरती माहिती वरून निवड प्रक्रियेमध्ये Online Test, Psychometric Test आणि Group Discussion आणि/किंवा Personal Interview यांचा पण समावेश होऊ शकतो.

अंतिम निवड ही प्रक्रियेची अचूक रचना आणि कोणत्या पदासाठी कोणती परीक्षा लागू होईल, हे अधिकृत जाहिराती मधल्या नियमांनुसार ठरवले जाईल.मित्रांनो म्हणून ही भरती “परीक्षा नाही” असे समजणे चुकीचे ठरू शकेल.

नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

मित्रांनो ही भरती All India basis वर निघालेली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती भारतातील Bank of Baroda च्या शाखा किंवा बँक कार्यालयांमध्ये होऊ शकते.

Bank of Baroda Recruitment 2026 साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.

  • Step 1:सर्वप्रथम Bank of Baroda च्या अधिकृत Career वेबसाइटवर जा.
  • Step 2:त्यानंतर Current Opportunities मध्ये BOB/HRM/REC/ADVT/2026/17 संबंधित भरती शोधा.
  • Step 3: स्क्रीनवर दिसणाऱ्या पात्र असलेल्या पदाची जाहिरात आणि पात्रता काळजीपूर्वक वाचा.
  • Step 4:Online Application वर क्लिक करून Registration पूर्ण करून घ्या.
  • Step 5:तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती भरा.
  • Step 6: जे आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड पूर्ण करा.
  • Step 7:तिथे जेवढे लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • Step 8:अर्ज Submit केल्यानंतर Application Form आणि Payment Receipt जतन करून ठेवा नंतर तुम्हाला कामी पडेल.

Bank of Baroda 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

Bank of Baroda च्या अधिकृत माहितीनुसार:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 4 सप्टेंबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2026

मित्रांनो दोन्ही पदांसाठी अधिकृत वेबसाइटवर 24 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख दिलेली आहे.त्यामुळे शेवटच्या दिवशी वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक किंवा पेमेंटशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहण्या ऐवजी अर्ज लवकरात लवकर करणे योग्य ठरेल.

महत्त्वाच्या लिंक्स 👇

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
होमयेथे क्लिक करा

Leave a Comment