PNB LBO Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांनासाठी मोठी संधी; मुदतवाढ, आजच करा ऑनलाइन अर्ज

PNB LBO Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं स्वप्न पाहत असणाऱ्या उमेदवारांना अधिकारी पदावर 545 पदांसाठी जागा निघालेले आहेत. उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने ही एक चांगली संधी सर्वांना उपलब्ध करून दिली. त्यासाठी Punjab National Bank ने Local Bank Officer (LBO) या पदांसाठी भरती काढलेली आहे.मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो या भरतीमध्ये फक्त 545 जागांसाठी Local Bank Officer ही पदे भरली जाणार आहेत. ते पदे फक्त Junior Management Grade Scale-I (JMGS-I) अंतर्गत असून, त्याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2026 पासून सुरू होऊन गेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2026 होती पण आता ती 16 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आल . म्हणून जराही उशीर न करता पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता ऑनलाईन अर्ज पूर्ण करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी उपलब्ध होऊ शकेल.

PNB LBO Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

तुम्हाला मी सांगू इच्छितो की या भरतीत म्हणजेच Local Bank Officer या पदाच्या फक्त 545 जागा अर्ज करण्यासाठी रिक्त आहेत. ही रिक्त पदे सध्या विविध राज्यांमध्ये वितरित केलेली आहेत.मित्रांनो महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी पण या भरतीमध्ये संधी मिळालेली आहे. दिलेल्या माहितीवरून आपल्या महाराष्ट्रासाठी 67 जागा असून त्या संबंधित स्थानिक बोलीभाषा म्हणून मराठी ही आवश्यक आहे. उमेदवाराने ज्या राज्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेला आहे त्या राज्याची आवश्यक असलेली भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे हे अनिवार्य आहे.

PNB LBO Bharti 2026 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?

मित्रांनो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असायला हवी .अजून त्या उमेदवाराकडे Post-Qualification Banking हे Experience असायला पाहिजे. अजून संबंधित माहिती वरून त्याच्याकडे Scheduled Commercial Bank किंवा Regional Rural Bank मध्ये Clerical किंवा Officer Cadre मध्ये किमान 1 वर्ष काम केलेला अनुभव असायला हवा.स्थानिक भाषेची अटLBO भरतीची अजून एक महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज केलेल्या राज्यातील आपली बोलता येणारी स्थानिक भाषा येणे हे देखील महत्त्वाचे आहे.जर त्या उमेदवाराने 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित स्थानिक भाषा ही विषय म्हणून शिकलेला नसेल, तर Local Language Proficiency Test (LLPT) द्यावे लागू शकते.

या भरतीसाठी वयोमर्यादा

मित्रांनो PNB LBO Bharti 2026 साठी त्या उमेदवाराचे वय हे साधारणरित्या 20 ते 30 वर्षे असणे गरजेचे आहे.तुमच्या वयाची गणना ही 1 जुलै 2026 या तारखेच्या आधारावर केली जाऊ शकते. आरक्षित प्रवर्गामधील उमेदवारांना नियमांनुसार वयामध्ये सवलत मिळण्याची शक्यता असू शकते. मित्रांनो अर्ज करण्या अगोदर त्या अधिकृत जाहिराती मधील Age Relaxation सर्व नियम तपासणे तुमच्यासाठी आवश्यक ठरेल.

PNB LBO Salary 2026: Local Bank Officer हे पद JMGS-I स्तरावरील पद असल्यामुळे निवडलेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळू शकते.दिलेल्या माहितीनुसार उपलब्ध भरती वेतनश्रेणी:₹48,480 ते ₹85,920याशिवाय त्या बँकेच्या नियमानुसार DA, HRA/Leased Accommodation, CCA, Medical Insurance, Leave Fare Concession, Retirement Benefits आणि विविध सुविधा पण लागू होऊ शकतात.म्हणजेच, बँकिंग क्षेत्रात अगोदरपासून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती करिअरमध्ये खूप पुढे जाण्यास चांगली संधी बनू शकते.

PNB LBO Bharti 2026 Application Fee

अर्ज शुल्क खाली दिलेली आहे:

SC/ST/PwBD: ₹59

इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹1,180

मित्रांनो शुल्कामध्ये GST समाविष्ट आहे आणि ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला शुल्क भरता येईल.

PNB LBO Selection Process

तुम्हाला सांगू इच्छितो की उमेदवारांची निवड ही एकाच परीक्षेवर होणार नाही. या भरती प्रक्रियेत पुढील टप्पे असणार आहेत:Online Written ExaminationScreeningLocal Language Proficiency Test (LLPT), लागू असल्यासPersonal InterviewDocument VerificationOnline Written Test मध्ये 150 प्रश्न असणार आहेत. चुकीच्या उत्तरासाठी त्यामध्ये नकारात्मक गुणांकनाची तरतूद करण्यात आलेली आहे. अंतिम निवड ही Online Written Test आणि Interview मधील कामगिरीवर अवलंबून असेल, व तसेच आवश्यक असल्यास तुम्हाला LLPT उत्तीर्ण करणे गरजेचे असणार आहे.

PNB LBO Exam 2026 कधी होणार?

मित्रांनो PNB ने सध्या परीक्षेची तारीख अद्याप सांगितलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ती परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता असू शकते. अधिकृत परीक्षा तारीख, परीक्षा केंद्र आणि Call Letter त्यासंबंधी माहिती PNB कडून पुढे जाहीर करण्यात येईलच.

PNB LBO Bharti 2026 साठी Online अर्ज कसे करावे?

अर्ज करते वेळेस उमेदवारांनी खालील पद्धत वापरावी:

  • Step 1: सर्वप्रथम PNB च्या अधिकृत वेबसाईटला ओपन करा.
  • Step 2: त्यानंतर Recruitments/Careers विभाग उघडा.
  • Step 3: उघडल्यानंतर “Recruitment of Local Bank Officers under HRP 2026-27” ही जाहिरात शोधून.
  • Step 4: Click Here to Apply वर क्लिक करून.
  • Step 5: नंतर आवश्यक Registration पूर्ण करून Login करा.
  • Step 6: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि Banking Experience ची सर्व माहिती काळजीपूर्वक भरून.
  • Step 7: लागणारी आवश्यक कागदपत्रे/फोटो/स्वाक्षरी नियमानुसार अपलोड करा.
  • Step 8: त्यानंतर Application Fee ऑनलाइन भरा.
  • Step 9: व अर्ज Submit केल्यानंतर Application Form आणि Payment Receipt सुरक्षित ठेवा.

Important Links

जाहिरात Pdf येथे क्लिक करा
Online अर्जApply Now
Homeयेथे क्लिक करा

Leave a Comment