Indian Overseas Bank Bharti 2026: मित्रांनो तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहत आहात का? असाल तर अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झालेली आहे. Indian Overseas Bank (IOB) ने विविध Generalist आणि Specialist Officer पदांसाठी तब्बल 291 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलेले आहे.
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पदे केवळ पारंपरिक बँकिंग क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाहीत. IT, Cyber Security, Information Security, Credit, Risk Management, Branch Management यांसारख्या क्षेत्रांतील उमेदवारांनाही संधी देण्यात आल्या आहेत.मित्रांनो त्यामुळे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी Banking, Finance, IT किंवा या क्षेत्रातील असेल आणि आवश्यक अनुभवाची अट पूर्ण होत असेल, तर ही भरती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
ही भरती कोणत्या पदांसाठी होणार?
मित्रांनो IOB ने वेगवेगळ्या विभागांमध्ये अधिकारी पदे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या शिक्षण आणि अनुभवाशी जुळणारे पद निवडणे खूप महत्त्वाचे आहे.या भरतीमध्ये Branch Management, IT, Information Security, Credit, Risk, Database Administration, Network Administration, Cyber Security आणि Security या पदांचा समावेश आहे.उदाहरणार्थ, IT क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी IT Manager किंवा Senior Manager सारखी पदे उपलब्ध आहेत, तर Banking आणि Finance पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी Branch Management, Credit आणि Risk संबंधित पदे उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
मित्रांनो या भरतीसाठी सर्व पदांची पात्रता समान दिलेली नाही. पदानुसार Educational Qualification आणि Experience बदलतो.काही पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे, तर IT आणि Cyber Security संबंधित पदांसाठी Computer Science, Information Technology किंवा संबंधित तांत्रिक शाखेतील पदवी/पदव्युत्तर पात्रता पण मागली जाऊ शकते.Credit आणि Risk Management या पदांसाठी Finance किंवा संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभव पण आवश्यक असू शकतो.म्हणून मित्रांनो केवळ “पदवीधर आहे” एवढ्यावरच पात्रता निश्चित नका करू. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ना, म्हणून त्या पदाची अधिकृत पात्रता स्वतःहून तपासणे आवश्यक आहे.
अनुभवाची अट का महत्त्वाची आहे?
मित्रांनो या भरतीमधील अनेक पदे Manager आणि Senior Manager स्तरावरचे असल्यामुळे संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे खूप महत्त्वाचे आहे .उदाहरणार्थ, IT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अनुभव IT/Software/Technology क्षेत्राशी संबंधित असणे अपेक्षित असू शकते. त्याचप्रमाणे Credit किंवा Risk पदासाठी Finance किंवा Banking संबंधित अनुभव असणे हे देखील आवश्यक आहे .मित्रांनो त्यामुळे अर्ज करण्याअगोदर तुमच्या Experience Certificate मधील कामाचा कालावधी आणि तुमच्या कामाचे स्वरूप अधिकृत जाहिरातीतील अटींशी जुळते का, हे पण तपासा.
IOB Bharti 2026 मध्ये पगार किती मिळू शकते?
Indian Overseas Bank मधील अधिकारी पदे वेगवेगळ्या Management Scales मध्ये आहेत. त्यामुळे वेतन पदानुसार बदलते.मित्रांनो उपलब्ध माहितीनुसार या पदांसाठी वेतनश्रेणी साधारणपणे ₹48,480 ते ₹1,05,280 दरम्यान आहे. याशिवाय बँकेच्या नियमावलीनुसार लागू असणारे विविध भत्ते आणि इतर सेवा-सुविधा पण मिळू शकतात.याचा अर्थ उमेदवाराने फक्त Basic Pay पाहू नये. Pay Scale, Allowances आणि इतर Benefits यांचा एकत्रित विचार करणे अधिक योग्य ठरू शकते.
या भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी होणार?
मित्रांनो IOB Officer Recruitment ची निवड प्रक्रिया ही संबंधित पदानुसार ठरवली जाते.पदानुसार उमेदवारांना Online Examination, Interview किंवा इतर मूल्यांकन प्रक्रियेला तोंड द्यावे लागते.विशेषतः Specialist या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या संबंधित विषयाची तयारी मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. IT उमेदवारांनी Technical Subjects, तर Credit/Risk संबंधित उमेदवारांनी Banking आणि Finance संबंधित विषयांवर जास्तीत जास्त भर द्यायला हवा.
अर्ज शुल्क
मित्रांनो उपलब्ध माहितीनुसार अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहे:- SC/ST/PwBD उमेदवार: ₹175- इतर उमेदवार: ₹1,000
अर्ज शुल्क भरल्यानंतर Payment Receipt जतन करून ठेवा. कारण भविष्यात अर्जाशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्यास तुमची ही पावती उपयोगी पडू शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
IOB Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया ही 29 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 आहेमित्रांनो शेवटच्या दिवशी अर्ज करण्याऐवजी उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायला हवी. विशेषतः शुल्क भरणे, कागदपत्रे अपलोड करणे यावर वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येणार नाही आणि शेवटच्या क्षणी त्रास होऊ शकणार नाही यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे
Indian Overseas Bank Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- 1. Indian Overseas Bank ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- 2. त्यानंतर Careers किंवा Recruitment विभागात जा.
- 3. 2026-27 Officer Recruitment ची अधिकृत जाहिरात शोधा.
- 4. जाहिरात सापडल्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार योग्य पद निवडा.
- 5. Registration करून Login करा.
- 6. Personal Details, Educational Qualification आणि Experience ची माहिती भरा.
- 7. मागितलेली कागदपत्रे Upload करा.
- 8. Application Fee भरा.
- 9. अर्ज Submit केल्यानंतर Application Form ची प्रत तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
- अर्ज भरत असताना नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती किंवा अनुभवाची माहिती चुकीची भरू नका. पुढील पडताळणीमध्ये माहिती जुळली नाही तर उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात ठेवा.
महत्त्वाच्या लिंक
| जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| होम | येथे क्लिक करा |